दारू पिऊन जग झोपले होते
बनविणारे टक्क जागे होते
रात्रीचा दिवस करत होते
सुशिक्षित मुले विष कालवत होती
पीढीजात धंदा चालवत होती
अन उच्चशिक्षित ढसाढसा ढोसत होते
दारू पिकविणारे निर्धास्त होते
दारु पिणारेच मरणार होते
काही संसार उध्वस्त होणार होते
ते गरळ पिणाराच मरणार आहे
पण धंदा बंद झाला तर
बेकारी अजून वाढणार आहे
हा धंदा चाललाच पाहिजे
कायदारक्षकांनी हे ओळखले होते
धाड पडणार हे आधीच कळवले होते
आजही सर्व तसेच आहे
झालेली दुर्घटना विसरण्यासाठी
जग सडक्या गुळाच्याच शोधात आहे
परप्रांतीय गावागावात घुसत आहेत
मराठी गळे नुसतीच ढोसत आहेत
कष्टाने कमावलेले गहाण टाकत आहेत
सर्व काही तसेच आहे
नितीमत्तेचा नवसागर होत आहे
रुपया-रुपयासाठी गरिब रोज मरणार आहे