काय बोलू?

काय बोलू? काय सांगू?

बंधने शब्दांवरी!
खेळ हृ्दयाचा परंतु
बेततो प्राणांवरी!
पाप पुण्यांच्या पखाली
का अशा जगण्यावरी?
दोष नियतीचा तरिही
आळ ये आपुल्यावरी!
आठवांचे रक्त डोळा
ओघळे गालांवरी!
जीवनाचे प्रेत सारे
वाहती खांद्यावरी!
पेटते प्रत्येक नाते
शेवटी सरणावरी!