आली रंगीबेरंगी होळी

आली रंगीबेरंगी होळी
झाली महाग पुरणपोळी
झाल्या महाग तांदूळ अन डाळी
महागाई सर्वांचे कानपीळी
रिकामीच आहे सामान्यांची झोळी...

आली रंगीबेरंगी होळी
मनी दहशतीची भीती काळी
नेत्यांची राजकारणी खेळी
जातो जनतेचा बळी
कधी सरेल दहशतीची रात्र काळी...?