इथे कल्पनांचे...

इथे कल्पनांचे किती अस्त झाले
युगांतास मी पाहतो हा अता
तुझ्या भोवती शेष अस्तित्व माझे
अता बंद डोळे तुझे खोल ना...

कधी रंग माझे न तू पाहिले ते
जसे पाहिले ना स्वत: मी कधी
अता रंग उडतात, गळतात माझे
तुझे सांग जपलेस ना तू तरी?

कसेही असो बोल अथवा नको ही
जिवातून ओळी तरी ऐक ना
तुला साद देऊन थकल्या जिवाच्या
प्रीत्यर्थ अश्रू तरी ढाळ ना...

-सुजीत