उन्हात ज्याचे घर
त्याची नको सावली तुझ्यावर...!
निस्टून गेले शहाणेपण ते
रंग अजुनही उरले त्याचे,
ते माझे वेडेपण!
उन्हात ज्याचे घर
त्याची नको सावली तुझ्यावर...!
तरंगतो मी अधांतरावर
तुला हवे घर सिद्धांतावर,
गोड अघोरी दडपण!
उन्हात ज्याचे घर
त्याची नको सावली तुझ्यावर...!
गळा स्वरांच्या धुनीत फिरतो
स्वरांचा सुरा आत्मा चिरतो
जगणे झाले मरण!
उन्हात ज्याचे घर
त्याची नको सावली तुझ्यावर...!
-सुजीत