हे ही गेले ते ही गेले,
मजसाठी जे माझे होते,
ते सर्वकाही गेले...
भुतकाळ सुखाचा,
वर्तमान चुकीचा,
भविष्य तो कुणाचा?
ते स्वप्न सुखांचे,
ते सर्वकाही गेले...
का गुंतलो मी?
का भांडलो मी?
का भंगलो मी?
जे माझे होते म्हणुन होते,
ते सर्वकाही गेले...
हे ही गेले ते ही गेले,
स्वप्नात पाय होते,
सत्यात शुन्य होते,
ते सत्य गेले,
ते स्वप्न गेले
जे जे म्हणेन मी माझे,
ते सर्वकाही गेले.....
चाणक्य