गारेगार सब्जा नारळपाणी पेय

  • नारळपाणी / शहाळ्याचे पाणी दोन पेले भरून
  • दोन चमचे सब्जा/ तुळशीचे बी किमान दोन तास अगोदर पाण्यात भिजवून
  • पुदिना पाने - सजावटीसाठी
  • गुलाब सिरप व गुलाब पाकळ्या
१० मिनिटे
दोन माणसांसाठी

दोन उभट पेल्यांमध्ये सर्वात खाली बर्फाचा चुरा घाला. त्यावर भिजलेले सब्जा/ तुळशीचे बी घाला. त्यावर थोडे गुलाब सिरप घाला. सर्वात वर शहाळ्याचे अथवा नारळाचे पाणी घाला. सजावटीसाठी वर पुदिन्याची पाने व कातरलेल्या गुलाब पाकळ्या घाला. स्ट्रॉ ने अलगद मिसळा व सर्व्ह करा. 

गुलाब सिरप ऐवजी तुम्ही इतर पर्यायही वापरू शकता. पण गुलाबाचा स्वाद व सुगंध ह्या पेयाला अजून खुलवतो.