माणूस खऱ्या अर्थाने जगतच नाही.

माणसे कशी हि वेडी वाकडी,
घालतात देवापुढे कित्येक साकडी.
भविष्याचा ठाव ना असे कोणाला,
तरीही रचतात कड्यावर कडी.

हें नाही ते नाही असे म्हणत,
मारतात नेहमीच कोलांटी उडी.
हातचे सुटले की फक्त दोष देत,
म्हणतात नशीबच आहे आपले रडी.

सगळेच कसे फक्त आयते बघतात,
समोरच्यावर अपेक्षांचा डोंगर रचतात.
डोंगराखाली तो कसा चिरडून जाईल
फक्त याचाच नेहमी विचार करतात..

लढतोय एकटाच थोडी मदत करावी,
असे कसे नाही येत यांच्या मनी.
वास्तवाला सत्याला प्रामाणिकपणे,
साथ द्यावी वाटेल काय क्षणोक्षणी,

प्रत्येकजण आज स्वार्थी झालाय,
काही ना काही मागतच सुटलाय.
करावे नवीन काही छातीठोकपणे,
वाढीव अपेक्षातच गुंतत चाललाय.

घेतलेल्या निर्णयाने भविष्य घडवू,
न घडले भविष्य तर सामोरे जावू.
अशी उमेद का कधी जागत नाही,
माणूस खऱ्या अर्थाने जगतच नाही.

कवी - राहुल भोसले
सोमवार/ ८-३-२०१०.
मो. ०९८९३९९०५१७.

RGB THE COLOURFUL********* LIFE.