हल्ली तुझे बोलणे फार फार कमी झालेय...

हल्ली तुझे बोलणे फार फार कमी झालेय...
अन माझ्या मनालाही फार उधान आलेय...
काही दिवसापूर्वी आपली ओळख झाली...
सहज बोलता बोलता गाढ मैत्रीही झाली..
 
मला आवड होती मने जाणून घेण्याची..
अन तुला मनात दडवून ठेवलेले  सांगायची..
तू सांगितले मला मैत्री तोडू नको आपली...
माझ्याकडून कधीही  होणार  नाही  गलती...
.
अशातच मनातल्या प्रश्नाचे वादळ उठले
हेलकावत पाचोळा  उत्तुंग नभात सुटले
मी  प्रयत्न केला तुला शमविता ना आले
माहित असताना तू किती  प्रयत्न केले..
 
वादळातील कठीण क्षण मी चटकन सोडवले.
उरलेल्या क्षणांना तू फायद्यासाठी उठवले 
काय तुला खरोखरच  फायदा झालाय?
का इतका  त्याग फक्त मैत्रीसाठी केलाय?
 
देवाने गरज फक्त प्रश्नांसाठी निर्माण केली
तुझी माझी मैत्री फक्त त्या उत्तरांसाठी झाली 
त्यासाठी फक्त सवांद हवाय कारण माहितेय..
हल्ली तुझे बोलणे फार फार  कमी झालेय....

 
कवी - राहुल भोसले
मंगळवार /९-०३-२०१०
मो ०९८९३९९०५१७ 

RGB THE COLOURFUL********* LIFE.