तुझ्या बाहूंत प्रत्येक वेळी रती नसते
सीता,मंदोदरीही असते
तुझ्या लक्षात असतो फक्त मदन...
नीरांजन लागावं अशी अपेक्षा जेव्हा
सामना धगधगत्या ज्वाळांशी ...
समर्पणाचा हाही अर्थ असतो हे कधी उमगेल तुला?
अस्तित्वच पणाला लागतं तेव्हा
गिळंकृत करायला आपलंच कुणी असावं
असं आणि इतकं हताश व्हायला होतं
... मग तूच तारणहार वगैरे,
यातून सुटका नाही...
असलीच तर हवी असंही नाही