मनी दाटले विचार करितो अविचारांची होळी
दिव्याने दिवा पेटविला केली दिव्यांची दिवाळी
पुरवीत पुरण पुन्हा बनविली पुरणाची पोळी
धाग्यात धागा गुंतवून जाळे सुरेख विणतो कोळी
मनी दाटले विचार करितो अविचारांची होळी
कळ्याच कळ्या वेलीवरी हाती सापडली सोनकळी
भ्रमर भ्रमितो फुलावरी तर फुले मिटती फुलपाकळी
फुलात फुले फुलली सुगंध दरवळे त्यांचा वेळोवेळी
मनात दाटले विचार करितो अविचारांची होळी
हास्यात हास्य हसवुनी पडते गाली गुलाबी खळी
रंगात रंग मिसळूनी होई तयार रंगेबिरंगी रांगोळी
अतिरेकी अतिरेक करुनी मग का मारतो गोळी
मनात दाटले विचार करितो अविचारांची होळी
मतास मते देवूनी मतदाते मतदान करतात खुळी
संसदेत सांसद करती गदारोळ अन जनतेचा जाई बळी
स्वतः स्वातंत्र्याच्या कराव्या लागतील का पुन्हा चळवळी
मनात दाटले विचार करितो फक्त अविचारांची होळी
कवी - राहुल भोसले
बुधवार/ १०. ०३. २०१०
मो. ०९८९३९९०५१७
RGB THE COLOURFUL********* LIFE.