अस्थप्रग्रा भाग - ३ (द्रव स्फटिकाचा दर्शक)

द्रव स्फटिकाचा दर्शक (एल्सीडी डिस्प्ले) किंवा "दसद"

प्रत्येक अस्थप्रग्राला एक द्रव स्फटिकाचा दर्शक असणे अत्यंत सामान्य झाले आहे. फक्त आकार व दर्जा किमतीच्या प्रमाणात बदलतो. ह्या दर्शकाच्या आत काय असते ते पाहू.

प्रकाशीत काच व पारदर्शी काचेच्या मध्ये द्रव स्फटिकांच्या निळ्या, हिरव्या व लाल रंगाच्या पेशी घट्ट दाबून बसवलेल्या असतात. ह्या पेशी मुलत: पारदर्शी असतात. ह्यांना विद्युत भार जोडला असता अपारदर्शी होतात. पुढील चित्रातून हे समजणे जास्त स्पष्ट होईल. तुमच्या दसद वर जिथे पांढरा भाग आहे त्या सगळ्या स्फटिक पेशींचा विद्युत भार शून्य आहे व ज्या ठिकाणी कोणताही रंग डोळ्यांना दिसतो आहे त्या रंगपेशीना विद्युत भार दिलेला आहे. 

ह्या दसद (एलसीडी) चा आकार अस्थप्रग्रात १ ते ३.५ इंच रुंद असतो. दसदचा आकार हा प्रग्राच्या आकाराला सांजेसाच असतो. दसद आकार संवेदकापेक्षा मोठा असल्याने छायाचित्रातील बारकावे नीट समजू शकतात. तसेच काही विशेष प्रग्रात हा दसद खाली वर किंवा गोल फिरवण्याची व्यवस्था असते त्याने अवघड जागेत छायाचित्र घेण्यास मदत होते.

निकॉन पी ९० चा दसद खाली वर करता येणे शक्य आहे. प्रग्रा पायाशी किंवा डोक्याच्या वर धरून छायाचित्र घेणे सुलभ होते.

सोनी प्रग्राचे भिंग एका हाताने धरून दसद (एलसीडी) चा भाग खाली वर फिरवता येणे शक्य असते.

प्रकाश - प्रकाश हा छायाचित्राचा आत्मा कसा ते समजणे सोपे करण्याचा हा प्रयत्न आहे. प्रकाश किरणे पावसाच्या, कारंज्याच्या, पाण्याच्या थेंबावरून परावर्तित झाल्याने डोळ्याला दिसणाऱ्या त्या पांढऱ्या प्रकाशात सप्त रंग आहेत हे आपण पाहतो. परंतु एका ठरावीक अंशातच हा रंगीत इंद्रधनुष्य दिसतो.  प्रकाश असेल तरच डोळ्याच्या माध्यमाने आपण वस्तू बघू शकतो. प्रकाशात दडलेले हे रंग पारदर्शी गणले जातात.

संशोधकांना लाल – हिरवा – निळा "लहिनि" (आर जी बी) हे तीन मूळ रंग असल्याचा उलगडा झाला. ह्या तीन रंगांच्या कमी जास्त मिश्रणाने इतर पारदर्शी रंगा छटा तयार होतात. म्हणून रंगीत प्रतिमा संवेदक व दर्शकात "लहिनि" हेच मुख्य रंग असतात. ह्या आकृतीत लाल + निळा = गुलाबी (मजेन्टा), निळा + हिरवा = सिआन, हिरवा + लाल = पिवळा तर मध्य भागात पांढरा तयार होतो. वस्तूच्या परावर्तित प्रकाशाचा उजेड म्हणजे ब्राईटनेस तर काळपट किंवा पांढरे असण्यातील जाणवणारा फरक "काप" (कॉन्ट्रास्ट) म्हटले जाते. (मला असे म्हणावेसे वाटते. मतभेद असणारच).

प्रकाश नसल्याने अंधार म्हणजे काळा रंग हे ठरले. अंधारापासून प्रकाशा पर्यंतचा फरक राखाडी रंग पट्टीच्या (ग्रे स्केल) साह्याने मोजतात. कोणत्याही प्रकाशाचा पांढरा रंग किती पांढरा आहे हे ठरवण्याचे माप केलव्हीन अंश (के डिग्री) तपमान असे आहे. संगणकाच्या प्रतिमा दर्शकाचा पांढरा रंग ५५०० ते ९३०० के अंश असतो. छाया व चल चित्रण व्यवसायात प्रकाश किती के अंश पांढरा आहे हे निश्चित करणे फार महत्त्वाचे मानले जाते. तसेच प्रकाशाचा उजेड (इंटेन्सीटी) एखाद्या पृष्ठभागावर किती आहे हे मोजण्याचे माप लक्स (एल एक्स) आहे. प्रकाश निर्माण करणाऱ्या साधनाची प्रकाश निर्माण क्षमता मोजण्याचे माप ल्युमेन (एल एम) आहे.

सूर्य प्रकाशाचे रंग तपमान सूर्योदयास १५०० के अंश तर भर दुपारी सूर्य डोक्यावर असताना ६५०० के अंश असते. ते सूर्यास्त पर्यंत पुन्हा १५०० के अंश होते. सूर्य प्रकाशाचे रंग तपमान असे दर तासाला वेगळे असते.

काही प्रकाश साधनांचे रंग तपमान समजणे आवश्यक आहे.
९३०० के अंश - संगणक दर्शक
६५०० के अंश - दुपारचा सूर्य प्रकाश
५५०० के अंश - क्षणिक प्रकाश "क्षप्र" (फ्लॅश)
३४०० के अंश – विजेचे दिवे
१८५० के अंश – मेणबत्तीची ज्योत

ह्या चित्रातून टोपीचे चित्र चार वेगळी प्रकाश योजना असताना चित्राचे रंग किती बदलतात हे समजते. रंग बदल दिसू नये म्हणून प्रत्येक अस्थप्रग्रात पांढरा रंग पांढराच दिसावा म्हणून निवड (मॅन्युअल) व स्वयंचलित क्रिया (ऑटोमॅटिक) पद्धतीची सोय दिलेली असते. त्याला पांढऱ्या  रंगाशी समतोल साधणे "पासम" (व्हाईट बॅलन्स) म्हणतात. (मी म्हणायचे ठरवले आहे).

झरोका, पडदा व उजेड क्षमता गुणांक (एक्स्पोजर व्हॅल्यू)

मराठी भाषेत हा शब्द "उक्षग" (ईव्ही) अशा नावाने मी देत आहे. प्रत्येक संवेदकाची सुबक विजक प्रतिमा (इलेक्ट्रॉनिक इमेज) तयार करण्या करता कमीत कमी उजेडाची क्षमता असते. तसेच जास्तीतजास्त उजेड सुबक प्रतिमा घडवण्याची क्षमता पण असते. त्यास संवेदकाचा कमी किंवा अधिक "उक्षग"(ईव्ही) म्हणतात. ही "उक्षग" संख्या प्रत्येक प्रग्रा उत्पादक किमती प्रमाणे वेगळी ठरवतो.

संवेदकाची "उक्षग" (ईव्ही / आय एस ओ) संख्या "दसद" वर दिसते. उजेडाच्या अंदाजाने आय एस ओ संखेची निवड करता येते. उदा. १००, २००, ४००. ८००, १६००, ३२०० व ६४०० आंतर्राष्ट्रीय मापन संस्था (आय एस ओ). विजक प्रतिमेचा उजेड व "काप" (कॉन्ट्रास्ट) यांचे नियंत्रण दोन भागांच्या मदतीने होते. एक भाग पडदा उघड / झाप होणारा वेळ (शटर स्पीड) व दुसरा भाग भिंगाच्या (लेन्स) आत असलेल्या झरोक्याचे सुनिश्चित क्षेत्र (ऍपर्चर एफ स्टॉप) कमी जास्त केल्याने नियंत्रण होते.

पडद्याची उघड / झाप वेळ "पवे" (शटर स्पीड) जास्त ३०, १६, ८, ४, २, १, १/२, १/४, १/८, १/१५, १/३०, १/६०, १/१२५, १/५००, १/१०००, १/२००० कमी सेकंद असतो. ३० सेकंद "पवे" म्हणजे जास्तीतजास्त प्रकाश संवेदकाला मिळणार. १/२००० सेकंद "पवे" म्हणजे अत्यंत कमी प्रकाश संवेदकाला मिळणार.

पडद्याची उघड / झाप वेळ "पवे" (शटर स्पीड) जास्त ३०, १६, ८, ४, २, १, १/२, १/४, १/८, १/१५, १/३०, १/६०, १/१२५, १/५००, १/१०००, १/२००० कमी सेकंद असतो. ३० सेकंद "पवे" म्हणजे जास्तीतजास्त प्रकाश संवेदकाला मिळणार. १/२००० सेकंद "पवे" म्हणजे अत्यंत कमी प्रकाश संवेदकाला मिळणार.

चित्रातील भिंगाचा झरोका (ऍपर्चर) क्षेत्र "क्ष" २ ते २२ आहे. झरोका क्ष २ भिंगाचा झरोका पूर्ण उघडा असल्याने जास्तीतजास्त प्रकाश संवेदकाला मिळणार ह्या उलट "क्ष" २२ भिंगाचा झरोका खूप बारीक सुनिश्चित आकाराचा असल्याने फार कमी प्रकाश संवेदकाला मिळेल. अशा प्रकारे संवेदकाचा "उक्षग", "पवे" आणि झरोका क्ष ने कमी प्रकाशापासून ते प्रखर प्रकाशा पर्यंत सुबक प्रतिमा मिळवण्याची सोय निवड (मॅन्युअल) पद्धतीने किंवा स्वयंचलित (ऑटोमॅटिक) पद्धतीने साध्य होते.

सामान्यतः: प्रत्येक प्रग्रात अशी चिन्हे असतात. ह्या चिन्हाची निवड केल्यास झरोका व पवे च्या सुनिश्चित संखेची निवड होते. ओळखपत्र म्हणजेच वस्तूच्या जवळ जाऊन घेतलेले चित्र. विस्त्रुत म्हणजे  वस्तूच्या भोवतालच्या प्रदेशाचे चित्र. अंधाऱ्या. जागेत घेतलेले चित्र प्रकारात क्षप्र (फ्लॅश) चा उजेड देखील नियंत्रित होतो.. धावती वस्तू ह्या प्रकारात पायी चालणारी व्यक्ती, खेळ, धावते वाहन वगैरे प्रकारांचे घेतलेले चित्र.

विजक क्षणिक प्रकाश "क्षप्र" (फ्लॅश) – प्रत्येक अस्थप्रगात क्षप्र हा असतोच त्याला नियंत्रणाचे दोन प्रकार आहेत. डोळ्याचे चिन्ह असलेला स्वयंचलित, ज्याने क्षप्रची क्षमता वातावरणातील उजेडाला अनुसरून नियंत्रित केली जाते. पूर्ण क्षमता चिन्ह नियंत्रण न करता क्षप्रच्या पूर्ण क्षमतेचा उजेड मिळतो.

अस्थप्रग्राने घेतलेल्या प्रतिमेचा साठा करणारी पट्टी (मेमरी कार्ड) ला मी साधे वापरता येईल असे "साठा" हे नाव सुचवीत आहे व वापरणार आहे. साठा पट्टीची क्षमता १ ते ८ जीबी (गीगा बाईटस) च्या छोट्या आकारात उपलब्ध आहेत. ह्यात प्रतिमा साठवण्याचा वेग व त्याचे प्रकार आहेत. ६०एक्स ते ३०० एक्स वेग असतो. कोणती साठ पट्टी वापरणे योग्य हे त्या प्रग्राच्या माहिती पुस्तिकेत दिलेले असते. कोणत्याही वेगाची पट्टी कोणत्याही प्रग्रात वापरता येत नाही.

विजेरी (बॅटरी) – विजेरी चा प्रकार प्रग्रा उत्पादकाने योग्य ठरवलेला असावा. थोडे रुपये वाचवण्या करता काही हजार रुपये मोजलेल्या वस्तू खराब होण्यात कोणता व कोणाचा फायदा असणार? मी स्वत: ४० हजार मोजलेल्या प्रग्रात एका अडलेल्या वेळी पानाच्या दुकानात मिळणारी साधी विजेरी वापरली व नंतर प्रग्रातील खराब झालेले भाग दुरुस्त करून घेण्यात १५०० रुपये गमवले होते.

वाचकहो प्रग्रा विकत घेताना साध्या सोप्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा. १ – प्रग्रा घ्यायची हौस आहे? का शेजाऱ्या जवळ आहे मग माझा का नसावा? २ – खिसा किती जड झाला आहे व किती रिकामा करू शकणार? ३ – निर्णय कोण घेणार? ४ – ऐकैव माहिती आहे की नातेवाईक / मित्राने सांगितले? ५ – प्रशिक्षण घेण्याची तयारी आहे का? ६ – छाया चित्रकारी व्यवसाय करणार का? उत्तरे शोधण्यास समर्थ असला तर फार चांगले, नसल्यास मी स्काईप मार्फत आयडी स्कीलसव्हीके मदत करण्यास तयार आहे. 

======
मजकुरात चित्रे अंतर्भूत करण्यासाठीः

१. चित्र असणाऱ्या दुव्याचे पान न्याहाळकाच्या वेगळ्या खिडकीत उघडावे.

२. त्या पानावर दिसणाऱ्या चित्रावर मूषकाच्या उजव्या बटणाने टिचकी मारावी.

३. मिळणाऱ्या पर्यायांमधून प्रॉपर्टीज निवडावे. एक खिडकी उत्पन्न होईल. तिच्यात त्या चित्राचा पत्ता h t m l  ...... png असा असेल तो प्रत काढून ठेवावा.

४. मजकुरात चित्रे कशी चिकटवावी ह्या लेखातील 'आंतरजालावर' ह्या खणात दिलेल्या माहितीचा उपयोग करून चित्र मजकुरात अंतर्भूत करावे.