शब्द

कधी कधी असं होत ,
शब्दच सुचत नाही.
कवितेच्या अपूर्ण ओळी,
पूर्णच होत नाही

कवितेला पूर्ण करण्या,
शब्दांमागे भटकायचं.
दडलेल्या शब्दांना,
इकडे तिकडे शोधायचं.

मनाच्या तुरुंगात ,
शब्द बंदिस्त असते.
तुरुंगाच्या दरवाज्याला,
कुलूप लागले असते.

वेगवेगळे शब्द ,
एकमेकांशी बोलत असतात.
कवितेच्या अपूर्ण ओळी,
तेही शोधत असतात.

चंचल अश्या मनाला,
थोडं शांत करायचं.
काही बंदिवान शब्दांना,
तुरुंगातून मुक्त करायचं.

असेच काही शब्द ,
थेट कागदावर उतरले.
माझ्या अपूर्ण कवितेला,
त्यांनीच पूर्ण केले.