मी सुद्धा लाचारच की काय?
बहुतेक आहेच!
माझे डोकेच समोरच्या पायावर लोळते आहे
सहज मिळाले नाही तर ओढावेच काय?
निर्लज्ज मी आहेच
हीन चिलटांचे मोहोळच मेंदूला चुचकारत आहे
मदतीचा हात मागावा काय?
मिळणार नाहीच
माझाही हात दुसऱ्याची धनरेषा शोधत आहे
दारिद्र्य माझे सांगावे की काय?
पटणार नाहीच
कर्जाच्या आभुषणांचा मुकूट मीच मिरवतो आहे
जिद्दीने पुढे सरपटावे की काय?
मुठीच्या ताकदीत भविष्यरेषांना दिशा दाखविणे
हाच एक योग्य-मार्ग आहे.