काय झालेय माहित नाही मी बदलायचे ठरवलय

काय झालेय माहित नाही मी बदलायचे ठरवलय
रोज सकाळी सुर्योदया अगोदर फिरायचं ठरवलय
कित्येक आठवणीतून भरपूर  फिरल्याचे सुचतय
लहानपण अगदी डोळ्यासमोर बागडताना दिसतंय
 
काय झाले माहित नाही फिरायचे कसे आवडले
बालपणात आवड होती तेव्हा सगळ्यांनी अडवले
तरीही वेळ मिळेल तेव्हा कुठेही दौडताच राहिलो
नद्या झरे डोंगरदऱ्या पशुपक्षी पाहतच राहिलो
 
काय झाले माहित नाही साधने होती फार कमी
फिरायला जायचे म्हणाले की  अडचणीची नक्की हमी
झाडांना जपत जपत अडचणीना तोडतच राहिलो
निसर्गाकडे बघत बघत होकारार्थ शिकतच राहिलो
 
काय झाले माहित नाही आता खूप काही बदललय
सिमेंटच्या जंगलात आणि  माणसात सगळेच हरवलंय
निसर्गाच्या अति  ऱ्हासामुळे परिणाम जाणवू लागलेत
पर्यावरण बचाव संस्थाही खूप ओरडून सांगू राहिलेत 
   
काय झाले माहित नाही मी खूप  ठरवलय बदलायचं
निसर्गाला वाचवण्यासाठी सकारात्मक काम करायचं
मनापासून साद घालतोय मित्रानो सर्वांनी सुरुवात करा
निसर्गाला समजण्यासाठी निसर्गातच फिरा... निसर्गातच फिरा.....

 
कवी - राहुल भोसले
शनिवार/१३. ०३. २०१०
मो. ०९८९३९९०५१७
email: rgbhosale@gmail.com 
 
 
RGB THE COLOURFUL********* LIFE.