ओहोळात कल्पनेच्या गीत ओले सांडून गेले
तळात उरल्या शुष्क शब्दांवर्तीच मग मी प्रेम केले
विचित्र चारित्र्यच विसळले अन अक्षर स्पष्त दिसू लागले
नकळत फिसकटलेल्या शाईवरतीच मग मी प्रेम केले
भरकटलेल्या कित्येक ढगांना मी आपलेसे केले
विरून थकल्या ठिगळावर्तीच मग मी प्रेम केले
सोकावलेल्या भुतांना शितांचे ते गणित न कळले
हातातल्या तुकडा भाकरीवरतीच मग मी प्रेम केले
मातब्बर वृक्षांनाही आज पानगळीने पछाडले
माझ्या वठलेल्या कृश देहावरतीच मग मी प्रेम केले
सत्याने पोळलेले तोंड ते वासलेलेच राहिले
निद्रीस्त जिभेवरच्या तुळशीवरच मग मी प्रेम केले