श्वास कोंडणारी अवेळ होती,
उभी वेळातली अवेळ होती.
नात्यास काय अनुबंध द्यावा,
तुझ्या माझ्यातली अवेळ होती.
तू माझ्यात सामावून जाता,
मला छेडणारी अवेळ होती.
चूक माझ्याच डोळ्यांची होती,
सांगणारी लख्ख अवेळ होती.
तुझ्या नसण्याचे निखारे अजुनी,
फूलवणारी ती अवेळ होती.
कुठे नेतील या वाटा आता,
तुज गहाळताना अवेळ होती.