न्याय नियतीचा

माज सौंदर्याचा फुलास आला
ते फुल ना मान देई कुणाला
रुपाचा उग्रावतार झाला

डहाळीचा आधार, फुल भुलले
मुळाखोडाची कृपा विसरले
हे आयुष्य क्षणभंगुर, हे विसरले

पक्षी एक जीवापाड प्रेम करे
फुल ना त्याची कदर करे
व्यभिचार बघुनी पक्षी तळमळे

सुवास त्या फुलाचा झाला विषारी
दिवसभर तो प्रेमी दबा धरी
एक दिवस मात्र घाव घातला देठावरी

आई पक्षाची दिवस-रात्र वाट पाही
निष्पापततेची देत राही ग्वाही
न्यायासनाभोवती घिरट्या घालत राही

जन्मठेपेतून पक्षी सुटून आला
खुनी पक्षास गुन्हा माफ झाला
कोमेजण्याआधीच
                        फुलाचा मात्र मृत्यू झाला.