लुटून जा

माझ्या नसण्यातली मी जरा लुटून जा,

वाहील्या अश्रूंच्या पाझरा लुटून जा.

तुझा हात सोडता मी मनी उदासले,

अस्त झाला ईथे अंतरा लुटून जा.

तुझा श्वास स्पर्षता मी मनी उमलले,

गंधच मम तनाचा बावरा लुटून जा.

जरा मरायचे ठरे तुळईच मोडली,

सोडिला फास मी कासरा लुटून जा.

उगाच मी शोधली जमीन पायातली,

अधांतरी चालते आसरा लुटून जा.

तू पुढे चालता काळ थांबतो ईथे,

मीच अडकले त्यात भोवरा लुटून जा.