आयोध्येच्या पराक्रमी , दशरथ राजाने
प्रारंभ केला, सूर्यनारायणाचे दर्शनाने
विनवले भास्करास, त्या दोन कराने
तेजस्वी पुत्र देई, मज प्रसन्न मनाने
दिवस होता तो, मंगल चैत्रशुद्ध नवमीचा
समय होता पवित्र,हो भर मध्यान्हीचा
नक्षत्रापैकी पुनर्वसु, या शुभ नक्षत्राचा
मंगलमय चंद्राच्या हो, कर्क राशीचा
जन्म झाला होता, शुभदिवशी रामाचा
आनंद मावेना पोटी, कौसल्या मातेच्या
रामा सारखा तेजस्वी, पुत्र हो प्रसवला
सार्थक झाले पाहुनी सावळ्या रामाला
माता झाली म्हणुनी , जीव सुखावला
उधाण आले असे सर्वांच्या, आनंदाला
शिंपडून सर्व रस्त्यावर, सडा केशराचा
उभारुनी गुढीतोरणे, मार्गात स्वागताच्या
स्वागत करती जन, सुरात हो सनईच्या
आनंद पसरे जनतेत रामाच्या आगमनाचा
वारस मिळाला असे, राजधानी आयोध्येला
पारावार उरला नसे आज,रघुकुल वंशजाला
असे हा शुभ मुहुर्त, शुभारंभाच्या कामाला
सुरवात करा जन हो, चांगल्या हो कामाला
यश, धन, शांती मिळेल , तुमच्या मानाला
सर्वजणांनी नतमस्तक व्हावे त्या रामाला