"हुतात्मा"
ते निरपेक्ष बुद्धीने लढले,
स्वातंत्र्य आम्हाला दिले॥ध्रु॥
आज त्यांचे नांवावर मात्र,
आम्ही आमुचे घर भरले॥
त्यांनी ना केली कधी,
आपुल्या जीवाची पर्वा।
झगडत राहिले ते,
सोबत घेऊन सर्वा॥
उत्सवासाठी आज त्यांच्या,
वर्गणीसाठी सर्व फिरले॥ध्रु॥१॥
जागोजागी रस्त्यात,
उभारून त्यांचे पुतळे।
आम्हीच निर्माण केले,
मार्गात हे अडथळे॥
उत्सवी घातलेले हार ,
सुकूनी जीर्ण झाले॥ध्रु॥२॥
आठवण त्यांची होते,
एकदाच वर्षातूनी।
वर्षभर मग ना,
फिरके तेथे कोणी॥
पाहून भामटेपण हा,
हुतात्माही वर रडले॥ध्रु॥३॥
अनंत खोंडे
२३\३\२०१०.