नाक्यावर

नाक्यावरती उभा चंद्र,  सोबत काही टवाळ तारे
देत पहारा, फुंकीत शिट्ट्या, उभे तपस्वी खट्याळ सारे

छेडती चांदण्यांना, उगीच अकलेचे तोडती तारे
झाकुनी जावळ, केसातच कोवळ्या हात मवाळ फिरे
 
उधाण वात्रटपणाला आणि चेकाळती   चवचाल सारे
कारंजी वाह्यात शब्दांची ती, अन खोडसाळ फवारे

सूर्यदर्शन होताच पळ काढती टपोरी ते भित्रे
चमकती काजवे समोर डोळ्यांच्या, अन नाठाळ पितरे

वाटे कधी ती लुकलुकली, अन फुलती हळ्वे निखारे
उल्काच होई तिची, अन हळुच मिटती वेल्हाळ पिसारे