तो

पाय वाटेवर तर सर्वच चालतात
वाटा शोधण्याची घे की तोहमत
धाडस धर अंगात,घाबरतोस काय?
घाबरतोस ! अरे ! मी आहे ना सोबत

एकट चालणं थोड जडच जात
वाट काही सरता सरत नाही
नाहक रस्ता चुकलो की काय?
माघे वळून मन उगाच पाहत राहत

सोबतीला माणूस आणि
कापडातली शिदोरी
पांथस्थाला अजून काय हवे
बळकट धाडसाची  दोरी

अनंता पासून मी चालतो आहे
मी नसतांना ही तो आहे
मी असतांना ही तो आहे
पळा पळाने पुढे हालतो आहे

रडताही  येते इथे
तसच हसता पण येते
कारण तो आहे सोबतीला
म्हणून सारकाही हालत आहे