ते ऋतूच होते फसवे

ते ऋतूच होते फसवे
अन्‌ खोटी होती शाई
ती खरी कल्पना होती
पण खरेच नव्हते काही!

"त्या उघड्या डोळ्यांनाही
पुन्हा जोखावे लागे"
हे सांगत आले स्वप्न
सत्याने भरता रागे

हा करार झाला होता
ते दिवस उगवण्याआधी
की भ्रमिष्ट या दिवसांनी
आता मावळणे नाही...