इटलीतील पहिला दिवस

हळू हळू संदेश पाठविणे मला येऊ लागले..... चाट रूमच्या आत गेल्यावर जंगी स्वागत झाले.  बऱ्याच युवतींनी आल्याबरोबर ईन्विटेशन दिले.... वा... बरं वाटलं..का विचाराल? आहो त्या जाहिराती होत्या हे कळायला दोन दिवस गेले.. अभ्यास बाजूला.. काहीतरीच वेगळा कार्यक्रम सुरू झाला... हाय!..हाय...हाय... असं सुरू होतच, मध्येच ए. ऐस. एल... मग इटलीतल्या एका (पुरूष) मित्राने वय, लिंग, स्थळ  असा अर्थ सांगितला. तो मित्र बरा वाटला.... पण त्याचे नाव baburaomba असे होते. मग आम्हाला कळले हे "बाबूराव एम.बी.ए. " पुण्याचे.... मला वाटले हे "बाबुरा ओंबा" इटलीचे असतील... पण आमचे शेजारीच निघाले. पुन्हा मात्र नाव अगदी लक्ष देऊन वाचू लागलो. माझ्या नावासारखी नावं बरीच होती. म्हणजे भारतीय नावं.  हळू हळू मेल आणि फ़ीमेल  यातला अर्थ कळू लागला. म्हणजे आम्ही रास्ता केव्हाच सोडला... होता. (क्रमशः)