जिव्हाळा
विसरलास कारे जिव्हाळा
सोडुनी जासी आम्हा बाळा
तुझ्यासाठी नाही पाहिला
उन्हाळा अन पावसाळा
तुझ्याचसाठी पिकविला हा मळा
विसरलास कारे जिव्हाळा
तुझ्याचसाठी राबलो रात्रंदिवस
फेडिले नाना नवस
कवटाळुनि मायेचा कळवळा
विसरलास कारे जिव्हाळा
आहेत आमुचे आशिर्वाद
संसार तुझा नव्हाळा
श्रावणबाळाची शपथ तुला
विसरू नको जिव्हाळा