चेहर्याची चांगली ही रीत नाही
अंतरीचे दु:ख तो लपवीत नाही
जाहला तो भंग का त्या मैफिलीचा?
हर कुणी होऊ शकत जगजीत नाही
वाघ त्या प्राण्यास का संबोधिले मी ?
का मला वाटे कुणा तो भीत नाही?
का असा दु:स्वास माझा तू करीतो
तो सुद्धा अन मी सुद्धा गुर्मीत ( गरमीत ) नाही
का असा कैलास चिंतातुर रे तू ?
का तुझा मक्ता कधी संधीत नाही ?
डॉ.कैलास गायकवाड.