अस्तास जाऊनीया स्मरतात माणसे ही
जित्तेपणी कशाला मरतात माणसे ही?
असुनी समोर चोरा, सोडुनी जाउ देती
दुबळ्यास निरपराधी,धरतात माणसेही
कसले अ"धर्म" राजे?कसली अ"धर्म" नीती?
द्युतात द्रौपदीला हरतात माणसेही
गर्दीत राहुनी जे मर्दुमकी करीती
एकांतवासी का मग डरतात माणसेही?
कितीही असोत पंखे, "कैल्या" तुझे तरीही (पंखा = चाहता )
करण्या समीक्षणाशी,ऊरतात माणसेही..
---डॉ.कैलास गायकवाड.