कहाणी

कहाणी

ऐकून माझी कहाणी

वीजही कडाडली

क्षणभरात ति पण लोपली

ऐकून माझी कहाणी

डोंगरही पाझरले

अश्रूंचे पाट वाहिले

ऐकून माझी कहाणी

रात्रही करवादली

दवबिंदुनी पहाट मुसमुसली

ऐकून माझी कहाणी

मेघही पाणावला

सारे म्हणती श्रावण आला