''खाय खाय..! '
मज सुटली आता खाय खाय ।।ध्रु॥
ही सत्ता जाता राहिल काय।
बागबगीचा बंगला नसेल।
नोकर चाकर सारे जातील॥
लाल दिव्याची गाडी ना राहिल॥
रस्त्याने जाता दुखतील पाय॥ध्रु॥१॥
अनेक योजना ज्या मी आणील।
त्यातून जी मी माया जमवील॥
सात पिढ्या ती बसून खाईल॥
जन कल्याण मज ठाव नाय॥ध्रु॥२॥
अनंत खोंडे.
१एप्रिल २०१०.