सुमार कात्री

आमची प्रेरणा : फणसे यांची 'रात्र'

कवितेचा आस्वाद खरडला टुकार कात्रीने 
नुसती भोके पाडुन गेला 'सुमार' कात्रीने

नुकती याने फुकट आणली, स्वतःच वापरली ..
बघता बघता पूर्ण फाटली विजार कात्रीने

उरली नाही लाज कशाची मुळीचही याला
शब्द कापले जुनेच... तेही उधार कात्रीने

ना कसले नावीन्य त्यात, गंजकाच कोनाडा
भंगाराचा माल सजवितो भिकार कात्रीने

उगीच मागे हात ठेउनी धरतो कात्रीला
नको तिथे फाटली, दिला मग नकार कात्रीने