दुष्ट संगती नको...!

दुष्ट संगती नको,

सांगती सुभाषिते!

दुष्ट कोण दाखवा,

त्वरित संग तोडतो!!

खरीच गोष्ट सांगतो,

जरी विचित्र भासते,

दुष्ट ना दुजा कुणी,

मज वाचूनी इथे

मांद्य मी पोशिले,

स्वार्थ जोपासले,

लोभ सोकावले,

मोह फोफावले!

अहं सांभाळले,

ममत्व मी जाळले!

संयमासी त्यागिले,

विचार संहारिले!

अंधश्रद्ध जाहलो,

वासनेत गुंतलो,

परपीडेत रंगलो,

दुष्ट मीच जाहलो!