तिकडे खचून कुणाचा क्षीण प्राण गेलेला
इकडे त्याने त्याचाच एक इश्यू केलेला
तिकडे घराने आर्त आकांत मोठा मांडलेला
इकडे कर्कश्श गदारोळ गृहात मांडलेला
तिकडे रडे तान्हुला कधीचा तहानलेला
इकडे हा पार्टीत खिदळतो झिंगलेला
तिकडे मदतीचा मोठा आव आणलेला
इकडे लाटावयाच्या मलिद्याचा हिशोब चाललेला
तिकडे रोज मरे त्यासाठी कोण रडे
इकडे नटवा नेता सत्तेसाठीच हपापलेला...