कितीही वेगातलं आयुष्य...

कितीही वेगातलं आयुष्य

मागे जातं कधीकधी

भरलेल्या जखमेतूनही

रक्त वाहतं कधीकधी

आपल्या जुन्या जखमांची

कल्पना कोणालाच नसते

कारण चेहरा हसरा असला

तरी वेदना मनात असते

आठवणींचे हरवलेले

पुस्तक क्षणात दिसते

आणि मुश्किलीने फुलवलेले

जीवन पुन्हा रुसते...