जीवनपान

बऱ्याच वेळा कळत नाही

काय चुकलं?   कुठे चुकलं?

धो धो पाऊस, बहरलं झाड,

असं अचानक का सुकलं?

अनुत्तरित प्रश्नांचा मागोवा घेण्यात

आपल्याच मनाला दिलासा देण्यात

कुठला आनंद, कुठलं समाधान,

आशा-निराशेच्या प्रश्नोत्तरात

पुन्हा कोरं जीवनपान