पालक-गाजर सूप

  • चिरलेला पालक १ वाटी,
  • एका गाजराचे तुकडे,
  • १ मध्यम कांदा, २ टोमॅटो,
  • ४ लसूण पाकळ्या, १ इंच आले, मिरिचे दाणे ४-५
  • २ चमचे लोणी.
१० मिनिटे

१) लोणी गरम करून त्यात किसलेले आले, वाटलेली लसुण आणि कांदा परतउन घेणे.

२) मग त्यात टोमॅटोचे तुकडे, पालक, गाजरचे तुकडे व थोडे पाणी घालून , झाकण ठेवून शिजवून घेणे.

३) मिरिचे दाणे घालून,  मिश्रण वाटणयंत्रातून बारिक वाटून घेणे.

४) हवे त्याप्रमाणे पाणी , साखर व मीठ चवीप्रमाणे घालून उकळणे.

गरम गरम पिणे. अतिशय रुचकर लागते.

अगदी बारिक वाटले की ह्याला कॉर्नफ्लोअरची गरज पडत नाही.

मैत्रिण