स्वप्न पूर्ती

आज अचानक पुन्हा उमलले

तेच अधुरे स्पंदन

आणि न रोखू शकलो मग मी

मजवरचे हे बंधन

मावळलेला सूर्य कालचा

पुन्हा उगवला पूर्वेला

अन आशेच्या किरणांनी

उजळून गेले अंगण