भूतकाळ

कधीतरी अडकते नजर

जुन्या 'अल्बम'च्या जाळ्यामध्ये

कितीही आवरले मनाला

तरी भूतकाळ तरळतो डोळ्यांमध्ये

पण लगेच आठवते मला

माझा कुठलाच नाही 'पास्ट'

आणि क्षणभरासाठी थांबलेले आयुष्य

लगेच होते 'फास्ट'...