सिक्कीममधील सौंदर्यपूर्ण वनस्पती

मी नुकताच सिक्कीमची सहल करून परत आलो. तिथे अनेक सुंदर निरनिराळ्या
वनस्पती पाहण्याचा योग आला. त्यातील काही सौंदर्यपूर्ण वनस्पतींची प्रकाशचित्रे इथे
आस्वादाकरता देत आहे. आशा आहे की आपल्यालाही ती आवडतील.

(सर्व चित्रे मोठ्या आकारमानात क्रमाने पाहण्यासाठी कोठल्याही
चित्रावर टिचकी मारून सरकचित्रदर्शन सुरू करावे.
)

लिली

नेचे

निवडुंग

वेलदोडा 

 घायपात

घायपात 

ट्युलीप 

हे तर गवतफूलच आहे.
जरी तुझिया
सामर्थ्याने, ढळतील दिशाही दाही ।
मी फूल तृणातील इवले, उमलणार तरीही नाही ॥
असले फूल उमलायचे तर सिक्कीमची
हवाच हवी. सामर्थ्य काय कामाचे!

लाली गुरांच
(ऱ्होडोडेंड्रम)

आणि त्याचे
पुष्पगुच्छ.
ही फुले अत्यंत आरोग्यदायी समजली जातात. निरनिराळ्या
व्याधींवर औषधी समजली जातात. यांचा गुलकंदही
करतात.

मोगऱ्यासारखे शुभ्र फुलांचे
झुडुप

... आणि त्याचा पुष्पगुच्छ. मुळात हिरव्या
कळीतून उमलत जाणारे शुभ्र फूल,  निळसर रंगच्छटा परिधान करत परिणत होत
जाते. 

ही आहे
हिमालयन सूचीपर्णी वृक्षांची हिरवीकंच
माया

हा आहे हिरव्या हिरव्या चहाचा हिरवा हिरवा
मळा 

ही आणखी एक घायपात आणि हा तिचा
कळा 

नरेंद्र गोळे या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच
आहे.