स्वप्नात रोज येतेस माझ्या , जीवनात कधी या येशील का ,
आयुष्यात दिसलीस कुठे तर , एकदा वळून बघशील का ॥
एकदा वळून बघितल्यावर , प्रेमात माझ्या पडशील का ,
एकदा प्रेमात पडल्यावर , स्वप्नात नंतर येशील का ॥
स्वप्नातून ह्या जाऊ नकोस , त्यासाठिच झोपतो मी ,
आयुष्यात ह्या येऊ नकोस , येशील म्हणूनच जगतो मी॥