माझ्या लेकाचा किस्सा.....

मुलांचे प्रोजेक्ट्स आणि आई-वडिलांची कसरत....

माझ्या मुलाला रात्री ११ः००-११:३० वाजता आठवण येते की उद्या टीचरने स्नो-मेन, कंदील, बुक-मार्क, वगैरे बनवून आणायला सांगितले आहे म्हणून. मग काय? करा धावपळ..... त्यातपण अर्धवट झोपेत चिरंजीव सांगतात " अगं टीचरने असं नव्हतं बनवलं; आता मी नाही नेणार हे. तू परत बनव. "

एकदा तर त्याने हद्दच केली होती. त्यांना शाळेत पर्यावरणाच्या तासाला एक फुलांचं झाड लावून आणायला सांगितलं होतं. त्याचबरोबर ते कसं लावलं, त्याची निगा कशी राखली हे पण समजवून द्यायचं होतं. नेहमीप्रमाणे रात्री लेकाने मला सांगितला हा प्रकार समजावून. मी म्हटलं "ठीक आहे. आपण एक छानसं झाड लावूया उद्या"

सकाळी उठून आपणच एक कुंडी शोधून आणली. त्यात माती भरली. मला म्हणाला "आता लाव झाड" मी आपला विचार केला धणे पेरूयात म्हणजे जरा लवकर रुजतील. कुंडीत पाणी घालून झालं. लेक एकदम खुश. सगळ्यांना सांगून आला कि, त्याने कोथिंबीरीचं झाड लावलय आणि त्याला खुप मोठी कोथिंबीर येणार आहे. त्याचा हा उत्साह पाहून माझं मात्रुहृ्दय भरून आलं. हास्य (पण मला माहित नव्हतं कि माझा फार लवकरच भ्रमनिरास होणार आहे ते. Star )

लेक तासाभराने आला आणि विचारतो कसा, " मम्मा अजून झाडं कसं आलं नाही? किती वेळ लागेल त्याला बाहेर यायला? मी स्कूलमध्ये जायच्या आधी येईल ना ते? "
मी: "अरे पण हो.... जरा धीर धर की. आत्तच लावलयस ना ते? मग लगेच कधी झाड उगवतं का? ४-५ दिवसाने येईल ते. "
लेकः "४ दिवसानी येऊन काय फायदा? माझी एक्झाम तर आज आहे आणि टीचरने सगळ्यांना कुंड्या घेऊन आजच बोलावलं आहे. (रडणं सुरु होऊन आवाज टिपेला पोहोचला होता एव्हाना ) आता सगळ्यांना मार्क मिळणार... मलाच टिचर पनीश करणार... मी नाही शाळेत जाणार.... Crazy "
मी: "हे तुला टीचरने काल सांगितलं नसणार? हो ना? "
लेकः "हो. लास्ट विकमध्ये सांगितलं होता...... पण मी विसरलो.... काल परत रिमाईंडर दिलं तेव्हा आठ्वलं... (माझी अवस्था मात्र Crazy angery ")

तोपर्यंत सगळे शेजारी-पाजारीपण जमा झाले आमचा गोंधळ पहायला. (आमची ८ खोल्यांची एकच गेलेरी आहे. )
मग एकेकाचे सल्ले चालू झाले. सगळे लेकाने धुडकाऊन लाव्ले. मला सुचतं नव्हत की काय करू? तेव्हढ्यात शेजारच्या आजी म्हणाल्या की त्यांनी तुळशित झेंडू पेरले होते, त्याची छोटी रोपं आली आहेत तीच लाव त्या कुंडीत. "

लेकाला समजावले कि झाड कसे लावायचे ते. तो पाठ करत होता " मेरीगोल्डचे फ्लावर तोडून कुंडीत टाकले, त्याला रोज पाणी घातले. मग त्याचे झाड झाले... Laughing out loud "

ईतक्यात खाली त्याची शाळेची रिक्शा आली आणि हा घाई-घाईत उतरला. टाटा करून घरात आले आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. साहेब झाड न घेताच गेले होते.   |(  मला काय करू ते सुचेना. ईतक्यात शेजारचे काका कामावर जायला निघाले होते, ते बिचारे त्याच्या शाळेत जाऊन त्याला झाड देऊन गेले.

संध्याकाळी स्वारी एकदम खुशित घरी आली. कोणत्या मित्राने कसलं झाड आणलं होतं, मग त्याने काय सांगितलं, वगैरे सां̱गून झालं.  मग म्हणतो कसा, " टीचरने मला व्हेरी गुड म्हटलं कारण माझ्यासारखं कोणालाच एक्स्प्लेन करता नाही करता आलं.  "  टीचरने त्याला ८/१० मार्क्स दिले होते. (मी अगदी धन्य-धन्य झाले. pray ).... जणू काही माझीच आज परीक्शा होती.....

परीजा......