" सुख म्हणजे"
सुख म्हणजे सुख असते।
ते दुःखा नंतर येते ॥
सुख म्हणजे सुख असते।
ते वेदने नंतर कळते॥
सुख म्हणजे सुख असते।
ते फार क्षणभर टिकते॥
सुख म्हणजे सुख असते।
ते सारखी वाट पाहायला लावते॥
सुख म्हणजे सुख असते।
असे येते नि असे जाते॥
सुख म्हणजे सुख असते।
त्याच्या आठवणीत "दुःख विसरायचे असते"॥
अनंत खोंडे.
१२\४\२०१०.