ध्रुवतारा

ध्रुवतारा

नाही वाटत काही

तुझे निघून जायचे

पण थांबत नाहीत अश्रू गळायचे

नाही वाटत काही

फुलांनी कोमेजायचे

पण थांबत नाही

सुगंध दरवळायचे

नाही वाटत काही

ताऱ्याने कोसळायचे

ध्रुवताऱ्याने सांग कसे

अढळपद सोडायचे