चालला प्रवास, आरंभाकडून अंताकडे
अनुभवली स्थित्यंतरे जीवनी चहुकडे
किती होता काळ, रम्य तो बालपणीचा
आनंद होत होता मला प्रत्येक कृतीचा
वर्षाव होत होता,तो माया वात्सल्याचा
लाडका झालो होतो,मी पहा सर्वांचा
बाल्यावस्था संपून आलो किशोरावस्थेत
अनुभवले सभोवतालच्या परिस्थितीत
संस्कारीत होत होते मन थोडे संभ्रमात
गुण अवगुण ते, शिरती हळुच शरीरात
सद्गुणांचे दुर्गुणांचे, चाले युद्ध ते जोरात
विजयी होत असे पक्ष, जो सबळ युद्धात
घडत असे मानव, बरे त्याच स्वरुपात
नियम असे सृष्टीचा, असा तो अलिखित
किशोरावस्था संपून पादार्पण यौवनात
ताबा घेती षड्रिपु, ते मनावर झोकात
जोश निर्माण होई , कांहीतरी करण्यात
प्रेमांकूरही फुटे हळुच, खरा याच वयात
होत असे विवाह मग, तो दृष्य स्वरुपात
फलित त्याचे दिसे, मुलांच्या स्वरुपात
जाई मग जीवन, संसाराच्या काळजीत
काळ जाई हो, माझा संपूर्ण अर्थाजनात
संपवुनी यौवन येई, कसा वृद्धावस्थेत
जबाबदाऱ्या संपती, माझ्या संसारात
व्यतीत करतो जीवन मग मी एकांतात
चालला प्रवास हा, माझा हो अंतापर्यंत