मानसज्योती

हेलावलेल्या हृदयामधूनी

एक भावना अशी उसळली

थरथरत्या या गालावरुनी

अश्रूंची एक सर कोसळली

मूकरुदनाचे उठले वादळ

दोन्ही नयना अखंड धारा

धूरकटलेले रस्ते सारे

गोठून गेल्या विचारधारा

सरले पाणी, निरभ्र डोळे

वाट स्वच्छ मग समोर होती

भावभावना शमले वादळ

संथ तेवते मानसज्योती