"तसवीर"
मी काळाआड जाणार आहे।
आठवणी फक्त राहणार आहे॥
कोणी नांव घेणार आहे।
कोणी नांव ठेवणार आहे॥
मी मात्र नाम रुपी उरणार आहे॥
माझ्या कर्तृत्वाची फळे दुसराच चाखणार आहे।
आंबट गोड म्हणून नाक मुरडणार आहे॥
माझ्या चांगुलपणाची आठवण कोणा राहणार नाही॥
वाईटास मात्र कोणी कधी विसरणार नाही॥
थोरा मोठ्यांचा इतिहास सर्वच वाचतात ।
अनुकरण करण्याचे मात्र विसरून जातात॥
माझाही इतिहास काही आठवतील।
कालांतराने सगळे विसरून जातील।
भिंतीवरील चौकटीत अनंतकाळ मी राहील॥
अनंत खोंडे.
२१\४\२०१०.