कळत नकळत

केव्हातरी ती मनाच्या मार्गाने

कळत नकळत हृदयात आली

आठवणीच्या फुलांचा सुवास

लेवुनिच ती इथे आली

ती जेव्हा समोर येते

जाणीवा मनात दाटतात

कळत नकळत मग

भावना स्पर्श करून जातात

अश्याच एका सांझवेळी

तिची नि माझी नजरभेट झाली

आणि कळत नकळत अशीच

प्रीत लागून गेली