(ओरड ......! )

(श्री. अलोक जोशी यांची माफी मागून)

[आमचे नेते मनोगतींचे भाग्यविधाते, विडंबन महर्षी, टारगटहृद्यसम्राट श्री. खोडसाळ जी]

गोरटेली सुबक ठेंगणी
मागे वळून पाहत असते
लाजून हसते त्या दिवशी 
श्रावणातली पौर्णिमा असते

मुसमुसणाऱ्या यौवनात
गजगतीने चालताना
मनातल्या मनात काही
षोडशेच्या ठरत असते

बहीण थोरली डावी रूपात
उपवर मात्र तीच आहे 
नका न्याहाळू दाजी मला
बोलत मज ती  राखी बांधते 

  दाजी = जीजाजी, जीजू हा अमराठी शब्द टाळण्यासठी वापरला.