"नवे किरण"
एकदा बसलो होतो विषण्ण मन: स्थितीत।
गतकालचा इतिहास आठवितं ।
त्या स्मृतींना उराशी कवटाळून;
जात नाहीत त्या आठवणी!
अजूनही वाट्तात ताज्या॥
जणू घडली घटना काही क्षणापूर्वी!!
भकास व भेसूर नजरेने ;
मी ते पाहत राहतो॥
भरधाव वेगाने येणारी मालमोटार।
ती आर्त किंकाळी नि चित्कार॥
सभोवतालच्या उंच उंच इमारतीत विलीन होतात।
क्षणात सर्व खेळ संपला। सारे शांत झाले॥
ना कोणी नातेवाईक; ना कोणी सगेसोयरे।
बेवारशी म्हणून ते फुटपाथवरील प्रेत,
पालिकेचे लोक घेऊन गेले!!!
का उगीच क्षणभर मी खिन्न झालो।
वाटे कितीजण असे या फुटपाथवर;
अंधार काळोखात येथे पहुडले आहेत।
उद्याच्या नव्या किरणांची वाट पाहतं!!!!
अनंत खोंडे.
२५\४\२०१०.