सुख

आनंद झाला जर मनी

सुख वाटे  मग जीवनी
शोधता न सांपडे रानी
ते  असते  खरे  सदनी
सुख वाटे पाहा जवाएवढे
दुःख वाटे हो पर्वताएवढे
उलगडता हो दुःख कोडे
अपेक्षाभंग उत्तर सांपडे
अपेक्षा ठेवतो मानव मनी
मुलगा होईल चाकरमानी
मुलीला मिळे श्रीमंत धनी
होईल आनंद खूप सदनी
सगे करती मदत संकटात
शेजारी हो वागतील प्रेमात
बॉस प्रशंसा करेल तोऱ्यात 
भारी आहेर मिळे लग्नात
होतो पाहा मग अपेक्षा भंग
झाला असे  पाहा मानभंग
मन होईल उदास निस्संग
दुःखात  होई  मानव  दंग
ठेवाव्या अपेक्षा मर्यादित
होई दुःख कमी प्रमाणात
असाल समाधानी मनात
सुख असे पाहा मानण्यात